Posts

Showing posts from November, 2019

समर्थांचा परमेश्वरवेध..

Image
समर्थांचा परमेश्वरवेध.. समर्थ खरे द्रष्टे..!त्यांना फक्त साध्य दाखवायचं न्हवत तर त्या साध्यापर्यंत पोहोचणारा मार्ग समजवायचा होता.तो ही ज्याच्या त्याच्या पद्धतीने.कुवतीनुसार.भगवंत प्राप्ती,ईश्वरप्राप्ती हे सगळं जरी साध्य असेल आणि ते प्रिय असेल तरीसुद्धा तिथपर्यंत घेऊन जाणारे सगळे मार्ग किती खडतर आहेत हे त्यांना नक्की माहीत होतं.परमेश्वर भेटणे आणी परमेश्वरसंगती या दोन्हीतला भेद त्यांनी कुशलतेन समजावून देताना सुख नक्की प्रवासात आहे मुक्कामात पूर्णता आहे हे सांगताल.पूर्णता आली की शोध संपला,आतुरता संपली..!  तो राम,हनुमंत भेटल्यावरही ते तिथंच न थांबता त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्या इष्ठ देवतांना सांगाती केलं,मार्ग प्रदीप केलं. गडावरच्या राममूर्तीत रामाच वर्णन केले तसे राम अवतरले पण त्यांचा राम हा देवळातला न्हवता तर तो एक विराट जनसमुदाय होता. देव तिथे शोधला..! देव कसा शोधावा ह्याची नवीन परिमाण त्यांनी सांगितली. राम शोधता शोधता स्वतः राममय होण्यातल खर सत्य त्यांना पटलं. कदाचित समर्थांचा आत्माराम तोच असावा. त्यांनी देवाला आशावादी चौकटीतुन बाहेर काढलं आणि प्रयत्नवादाची म...