Posts

समर्थरचित चौपदी (भाग १)

*समर्थरचित चौपदी..* *भाग १* *कोमळ वाचा दे रे राम..* *विमळ करणी दे रे राम.* *प्रसंगओळखी दे रे राम.* *धूर्तकळा मज दे रे राम!* समर्थ म्हणतात.. रामराया...माझ्या शरीरातले जीभ,तिने प्रकट केलेले उच्चार आणि त्यायोगे निर्माण होणारे संभाषण अर्थ यावर सगळी आयुष्यातली मदार आहे.तीच हे स्वरूप कोमल असावं असं समर्थ म्हणतात.निग्रह सुद्धा निक्षून सांगावा लागू नये इतका सहजपणे व्यक्त व्हावा..!त्याला कोणत्याही हट्टाची किनार असू नये.अशी वाचासिद्धी मिळण्यासाठी समर्थ रामरायाकडे मागण मागतात.रामराया..माझी वाणी ही सोशिक,प्रेमळ,आल्हाद आणि नेमकी अशी दे..!! समर्थ म्हणतात... रामराया,वाचा किंव्हा वाणी यानंतर वेळ येते कृतीची.विमळता म्हणजे सहज आणि सहृदय.कोणीतही कृत्य हे सहृदय म्हणजे खलप्रवृत्ती शिवाय माझ्या हातून घडू दे.किल्मिष आणि कुटीलतेचा स्पर्श माझ्या कुठल्याच कृत्याला असू नये..!अशी कृत्य करायची बुद्धि मला रामा तू दे रे..! समर्थ म्हणतात... रामराया.. आयुष्य जगताना येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाची खरी ओळख मला करून दे.तो प्रसंग मला आरस्पानी बघायची कला मला मिळू दे.अनेक प्रसंग वरकरणी दुःखदायक वाटले तरी त्याचा गाभा,परिणाम सुखा...

समर्थांचा परमेश्वरवेध..

Image
समर्थांचा परमेश्वरवेध.. समर्थ खरे द्रष्टे..!त्यांना फक्त साध्य दाखवायचं न्हवत तर त्या साध्यापर्यंत पोहोचणारा मार्ग समजवायचा होता.तो ही ज्याच्या त्याच्या पद्धतीने.कुवतीनुसार.भगवंत प्राप्ती,ईश्वरप्राप्ती हे सगळं जरी साध्य असेल आणि ते प्रिय असेल तरीसुद्धा तिथपर्यंत घेऊन जाणारे सगळे मार्ग किती खडतर आहेत हे त्यांना नक्की माहीत होतं.परमेश्वर भेटणे आणी परमेश्वरसंगती या दोन्हीतला भेद त्यांनी कुशलतेन समजावून देताना सुख नक्की प्रवासात आहे मुक्कामात पूर्णता आहे हे सांगताल.पूर्णता आली की शोध संपला,आतुरता संपली..!  तो राम,हनुमंत भेटल्यावरही ते तिथंच न थांबता त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्या इष्ठ देवतांना सांगाती केलं,मार्ग प्रदीप केलं. गडावरच्या राममूर्तीत रामाच वर्णन केले तसे राम अवतरले पण त्यांचा राम हा देवळातला न्हवता तर तो एक विराट जनसमुदाय होता. देव तिथे शोधला..! देव कसा शोधावा ह्याची नवीन परिमाण त्यांनी सांगितली. राम शोधता शोधता स्वतः राममय होण्यातल खर सत्य त्यांना पटलं. कदाचित समर्थांचा आत्माराम तोच असावा. त्यांनी देवाला आशावादी चौकटीतुन बाहेर काढलं आणि प्रयत्नवादाची म...

DASBODH CHINTAN दासबोध चिंतन

                                                    || श्री रा म समर्थ ||                                                                                                          ग्रंथारंभलक्षण  ( मंगलाचरण )                       श्रोते पुसती कोण ग्रंथ | काय बोलिले जी येथ |                        श्रवण केलियाने प्राप्त | काय आहे || श्रीराम ||  सर्व साधारणपणे प्रत्येक माणसाच्या मनात एखादी नविन किंवा बंद वस्तु पाहिली मग तो एखादा डबा असो, पेटी असो एखादे पुस...